पंढरपूरचा विठ्ठल बा विठोबा हे तुकारामांचे आराध्य देव होते.. हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आम्ही देवाचे स्मरण करीत असतो, संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते.
संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.
"हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आम्ही देवाचे स्मरण करीत असतो"संत तुकाराम महाराज बीज हा संत तुकारामांचा वैकुंठ गमन दिवस मानला जातो.
तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते म्हणून हा दिवस "तुकाराम बीज" म्हणून ओळखला जातो.
संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते. पंढरपूरचा विठ्ठल बा विठोबा हे तुकारामांचे आराध्य देव होते संत तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात.
पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी आठ वाजता संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व विना पूजन, त्यानंतर दुपारी १२ ते ०२ वाजेपर्यंत पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्यावतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आलेले भाविक वारकरी ग्रामस्थ यांनी या शिबिराचा लाभ घेतला त्याचप्रमाणे हळदीकुंकू कार्यक्रमासाठी महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. भजन , समाजभूषण सचिन बुवा लोंगले यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे संस्थापक ज्ञानेश्वर साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सल्लागार उत्तम भाई ठोंबरे जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव तालुका युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, रामदास तुपे, शरद श्रीखंडे विजय दाभणे सचिन लोंगळे दीपक गायकर, रोहिदास लोंगळे, मंगेश जाधव, ब्रमेश जाधव.. आधी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments