कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो परंतु तेथील आदिवासी नागरिक , तरुण व्यसनात बुडाले होते, परंतु तेच तरुण श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निरुपनातून श्रवण करू लागली असून ती व्यसनातून मुक्त झालेली आहेत. आज खेडोपाड्यावर श्री बैठकीतून बालसंस्कार घडवले जात आहेत. तरुण वर्ग वाम मार्ग सोडून आपल्या व्यवसायात लक्ष देत असून उत्तम प्रपंच संभालत आहेत. आज ही कृपा गेली अनेक वर्ष डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कृपेने होत असल्याने तेथील आदिवासी समाज संघटनेकडून थोर निरूपणकार डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व निरुपणकार दादा धर्माधिकारी यांची अलिबाग येथील रेवदंडा येथे भेट घेत आशीर्वाद घेतले.
रोजगार मेळावे, स्वच्छ ता मोहिमे, व्यसन मुक्ती केंद्राची स्थापना, आरोग्य शिबिरे, समाज प्रबोधन, बाल संस्कार वर्ग, रक्तदान शिबिरे, यांसारखे अनेक उपक्रम. डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळी देखील त्यांनी आवर्जून सांगितले की आपण रक्त बनऊ शकत नाही मग ज्यांना रक्ताची आवश्यकता आहे त्यांना आपण इतर निरोगी लोकांनी रक्तदान करायला हवे जेणें कारण लोकांना जीवदान मिळेल. कार्य कोणतेही असो त्यातून लोकांमध्ये समाजा प्रती सेवाभाव रुजविण्याचे काम या पूर्वी आप्पासाहेबांचे वडील डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांनी केले आणि हेच कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी आपल्या मोठ्या साधकांसह भारतासह जगभरात पुढे नेत आहेत.
यावेळी आदिवासी समाज संघटने कडून थोर निरूपण का डॉ. श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना संघटनेचे सन्मानपत्रक देऊन सलमान करण्यात आला त्यावेळी उपस्थित आदिवासी समाज संघटना अध्यक्ष परशुराम दरवडा, महिला अध्यक्षा जयवंती हिंदोला, महिला उपाध्यक्षा नीलम ढोले , सचिव भगवान भगत, नेरूळ ग्रुप ग्रामपंचायत चे माजी सरपंच उषा पारधी , निर्मिला पादिर, रूपा पारदी, दत्तात्रय हिंदोळा, खजिनदार अर्जुन केवारी, वसंत ढोले, पत्रकार मोतीराम पादिर, कृष्णा पारधी, जोमा निरगुडा, मनोहर दरवडा, तुळशीराम निरगुडा, परशुराम निरगुडा, संतोष दरवडा, हेमंत निरगुडा, जैतू पारदी, भिकू वाघ, बबन शेंडे, भरत अगिवले, गोविंद दरवडा, ई उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments