प्रतिनिधी / ..नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील . शेलु परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साइटवर अज्ञात चोरट्याने 23 जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास टेम्पो भरून साहित्य चोरी केले होते याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा 2023 चे कलम नुसार 331(3)(4) आणि 305(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रभारी शिवाजी ढवळे यांचे नेतृत्वाखाली त्यांची पोलिस टीम करत होती. चोरीच्या घटनेच्या ठिकाणाहून नेरळ पोलिसांनी सुरू केला तपास चोराच्या घरा पर्यंत पोचला होता.100 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करीत आपल्या खबऱ्याच्या माध्यमातून नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवाजी ढवळे व पोलिस अधिकारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात जाऊन पोहोचले. चोरट्याने गुन्ह्यात वापरलेल्या एम एच 05 बी एच 8289 छोटा हत्ती पिकप हा चोरीचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले. याबाबत कल्याण खडकपाडा या पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला होता.
तपासाची चक्रे फिरवत नेरळ पोलिसांनी पडघा येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या चोरीच्या टेम्पोची चौकशी केली असता हा टेम्पो 37 वर्षीय मोहम्मद आरिफ जुम्मन अहमद चौधरी हा चालवत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी सीताफिने मोहम्मद याला पकडले आणि खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. मोहम्मद हा मुळचा भिवंडीतील येवईनाका बीएमसी ऑफिस समोर बापगावं येथील राहणार आहे. या गुन्ह्यात आणखी एक साथीदार असून, त्याचे नाव अनिल विश्वकर्मा असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मोहम्मद चौधरी यांच्याकडून चोरीला गेलेले पाच लाकडी दरवाजे , दोन हॅमर मशीन, कटर मशीन, दोन राखाडी लांबीचा एक पंप, आठ डोअर किट असलेले बॉक्स, असा एकूण 44 हजार750 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला व चोरीस वापरलेला पिकप टेम्पो असा एकूण दोन लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला, दरम्यान आरोपीस न्यायालयात सादर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला पकडण्यात येणार असल्याचे नेरळ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments