Type Here to Get Search Results !

पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने जनजागृती.

.  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शासकीय कार्यालयांना निवेदन, जनजागृती करणे गरजेचे, आरोग्य उपाय योजना राबविण्यात याव्या. प्रदेश कमिटी अध्यक्ष यांचा पुढाकार..
      प्रतिनिधी / राज्यात जि.एस.बी. रुग्ण संख्येत वाढ होत असून अ. मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशनच्या वतीने राज्यात व जिल्ह्यामध्ये जनजागृती म्हणून जिल्हा कलेक्टर साहेब, जिल्हा परिषद विभाग अलिबाग, कर्जत तहसीलदार, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे, पंचायत समिती, आरोग्य सभापती विभाग, यामध्ये. निवेदन देऊन जनजागृती करण्याचे काम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतले आहे.

     जी.एस.बी. रुग्णसंखेत वाढ होत असताना, त्याचे रुग्ण काही जिल्ह्यात आढळून आले आहेत, सध्या पुण्या जिल्ह्यात रुग्णाची संख्या १५८ असून २१ व्हेंटिलेटर वरती आहेत, तर या जिल्ह्याच्या सीमेवर रायगड जिल्हा सुरू होत असल्याने, आपल्या जिल्ह्यात असे काही रुग्ण आढळून नये म्हणून, आरोग्य विभागाने उपाय योजना राबवावी, संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगले यांच्या पुढाकाराने जनजागृती चे कार्य हाती घेतले आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करून भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून, प्रामुख्याने शालेय विद्यार्थी यांमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी जनजागृती व माहिती आणि उपाययोजना यांसारखे कार्यक्रम राबवावे. या वेळी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे , रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, जिल्हा सेल अध्यक्ष श्री कृष्णा पवार, सह संघटक कर्जत संतोष थोरवे, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, शांताराम मिरकुटे, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments