Type Here to Get Search Results !

खुशबू मृत्यू प्रकरणी आमदार महेंद्र थोरवे घेणार राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईगे व राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश बाविटकर यांची भेट..


  पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यर्थ्यांनीचा दुर्देवी मृत्यू...वडील नामदेव ठाकरे यांचा काळजाचा तुकडा हिरावला,. आरोग्य विभाग जबाबदार.

    प्रतिनिधी / . अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद (आरक्षी) पोलीस फ्रेंड असोसिएशनच्या वतीने , पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आदिवासी आश्रम शाळा येथे चुकीचे औषध दिल्याप्रकरणी एका चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. यासंदर्भात पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या वतीने पोलीस कार्यालय कर्जत वरिष्ठ पोलीस निरीक्षक व उपअधीक्षक कर्जत तसेच कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन सखोल चौकशी करून आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासंदर्भात आमदारांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

   या घटनेतील शासकीय आरोग्य यंत्रणेतील आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि या संदर्भात आमदार थोरवे यांनी राज्याचे  आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके तसेच राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर  यांची मुंबई येथे भेट घेऊन रीतसर पत्र देऊन मागणी करणार असल्याचे आश्वासन पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले.

  पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या चौथी इयत्तेतील खुशबू नामदेव ठाकरे हिचा कुष्ठ रोगावर उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.२२ डिसेंबर २०२४ रोजी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला . संबंधित प्रकरणी पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया  यांच्या कडून सुदृढ असलेल्या खुशबू हिला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवले, चुकीची औषधे दिल्याने तिचा मृत्यू झाला होता, याप्रकरणी दोषी असलेल्या आरोग्य विभाग तसेच शासकीय आश्रमशाला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळुंखे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली. महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, आपल्या मागणीचे पत्रक आमदार थोरवे यांना सादर करण्यात आले तसेच रायगड जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक यांना या निवेदनाची प्रत पाठवून दिली आहे.

      खुशबू मृत्युप्रकरणी काय सत्य आहे हे समोर आले पाहिजे . यावेळी नामदेव ठाकरे यांचा काळजाचा तुकडा यंत्रणेच्या चुकीमुळे हिरावून गेला. त्यामुळे या प्रकरणाची उकल व्हावी खुशबू ठाकरे हिला न्याय मिळावा यासाठी आपण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तसेच राज्याचे आरोग्य मंत्री यांची मुंबईत भेट घेणार आहोत. यावेळी खुशबू ठाकरे यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन देणार असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आश्वासन दिले . यावेळी संघटनेचे प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोगले, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु.प्रफुल जाधव, जिल्हा सेल अध्यक्ष श्री कृष्णा पवार, तालुका सहसंघटक श्री संतोष थोरवे, सेल अध्यक्ष शांताराम मिरकुटे, उपाध्यक्ष गोविंद सांबरे, सदस्य संतोष पवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments