Type Here to Get Search Results !

कर्ज चारफाटा मुख्य सर्कल वरील खड्डे ठरतात जीवघेणे. खड्डे भरण्यात यावे अन्यथा रस्ता रोको आंदोलनास सामोरे जावे.. .

 


  कर्जत चारफाटा मुख्य कर्जत कल्याण, मुरबाड, कर्जत रेल्वे स्टेशन रोड वरील खड्ड्यांच साम्राज्य, खड्डे भरण्यात यावे अन्यथा रस्ता रोको आंदोलनास सामोरे जावे,

छोटे मोठे अपघात रोखण्यासाठी अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद..(आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली या संघटनेचा पुढाकार..

या सर्कल वरील खड्डे ठरतात अपघाताला निमंत्रण, आणि शनिवार रविवार च्या होणाऱ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम च कारण... संघटनेच्या पदाधीकाऱ्यांनी दिले उपविभागीय अभियंता अधिकाऱ्यांना निवेदन...

   कर्जत / प्रतिनिधी ;   कर्जत चारफाटा येथील महत्त्वाच्या सर्कल वर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे वाहनांना तसेच स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

 अ पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद (आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन च्या वतीने आज उपविभागीय अभियंता मुख्यअधिकारी वानखेडे साहेब यांना संघटनेचे निवेदन देण्यात आले आहे.

 चारफाटा या मुख्य सर्कल ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे खड्ड्यातून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत चारफाटा मुख्य सर्कल या ठिकाणी कर्जत चौक, कर्जत मुरबाड, कर्जत कल्याण, कर्जत रेल्वे स्टेशन. या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या संख्येने असते.

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात देखील या ठिकाणी झालेले आहेत. तसेच खराब रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांना ये जा करण्यासाठी देखील त्रास सहन करावा लागत आहे.

दर शनिवार रविवार व सना सुदी या ठिकानी खूप मोठ्या संख्येने बाहेरील   पर्यटक कर्जत, माथेरान या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. परंतु कर्जत हे मध्यवर्ती ठिकाण आणि पर्यटनासाठी प्रसिद्धीच असल्याने   पर्यटक येथे येत असतात. कर्जत चारफाटा मुख्य सर्कल वर खड्डे खूप मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी ट्रॅफिक ची ही समस्या निर्माण होते,त्या मुळे आज अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे व प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या मार्गदरशनाखाली संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर भरावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन सुरू केले जाईल. या शब्दात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे.

या वेळी उपविभागीय कार्यालय कर्जत येथे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे, त्यांनी म्हटले की हा जो प्रश्न आहे तो MSRDE (एम एस आर डी ई) यांच्या कडे आहे त्या मुळे तुमचे पत्र आम्ही त्यांच्या कडे पाठऊन या कर्जत चारफाटा सर्कल रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रस्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.

 या वेळी संघटनेचे प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे , रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, जिल्हा सदस्य संतोष पवार, वॉर्ड अध्यक्ष ओंकार घरत, अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments