Type Here to Get Search Results !

चुकीच्या औषधा मुले पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थीचा मृत्यू.. तर न्यायासाठी पोलिस संघटना सरसावली..


 प्रतिनिधी /.. पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आदिवासी आश्रम शाळा येथील घटना.. दोषींवर कठोर कारवाई व्हावी , न्याय व हक्कासाठी . पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटना सरसावली,...  या प्रकरणातील अधिकारी यांची चौकशी व्हावी...

   शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शालेय हलगर्जी पणामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेला दहा दिवस झाल्यानंतर देखील आदिवासी विकास विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या कडून कोणत्याही प्रकारची कारवाई शासकीय आश्रम शाळा तसेच आरोग्य विभागावर करण्यात आलेली नाही.

या दरम्यान प्रकल्प अधिकाऱ्यांची भूमिका खुशबू ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणी संशयस्पद असल्याचे दिसून येते आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी या साठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली, अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेने पुढाकार घेतला आहे.

  खुशबू नामदेव ठाकरे हे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून, माहितीनुसार  खुशबू हिला कोणताही आजार नसलेल्या तिला कुष्ठरोगी ठरवण्यात  आले, आरोग्य विभागाने मुलीच्या पालकांना कळविले नाही, चुकीची औ ष धे घेतल्यामुळे मुलीच्या अंगावर फोड्या आल्या, हाता पायाला सूज, शेवटी पुढील उपचारासाठी एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आली शेवटी 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला, या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.आणि या कुटुंबाला आधार, न्याय मिळवून देण्यासाठी अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे यांच्या पुढाकाराने, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव, जिल्हा सेल अध्यक्ष कृष्णा पवार, तालुका सह संघटक संतोष थोरवे, सेल अध्यक्ष शांताराम मिरकुटे, माणगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच शरद देशमुख, यांच्या वतीने पोलिस निरीक्षक साहेब यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी ....


Post a Comment

0 Comments