छत्रपती शिवराय यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला, छत्रपती शिवरायांची जिद्द, पराक्रम, व्यवस्थापन, नेतृत्व आणि कौशल्य आजही प्रेरणा देतात.
प्रतिनिधी / दिं.१९ फेब्रुवारी २०२५, बुधवार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्ताने डिकसल पाळी येथील तुलसी छायावसाहात मध्ये अनंदात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद..( आरक्षी )पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले राज्य हे सर्वसामान्य लोकांचे होते. या राज्यात कोणालाही हींन वागणूक दिली जात नव्हती, शिवराय हे महाप्रतापी तर होते, पण याचबरोबर ते उत्तम प्रशासक ही होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेमध्ये सगळ्याच धर्माचे व जातीचे लोक होते.पण त्यांनी कधीही लोकांमध्ये धर्मावरून मतभेद केले नाहीत. त्यांनी नेहमीच साऱ्याच धर्मांना समान वागणूक दिली. ते प्रत्येक स्त्री ला माते समान म्हणून तिचे रक्षण करत असत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नेतृत्व, युद्धनीती आणि त्यांच्या राज्यव्यवस्थेचा आदर्श आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने या मोफत आरोग्य शिबिरात , इसिजी, बिपी, सुगर, कॉलेस्ट्रॉल, डोले तपासणी मोफत औ ष धे वाटप करण्यात आले,
या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे तालुका सहसचिव मनेश ठाणगे, तालुका सेलू उपाध्यक्ष सुनील गोरे यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी मधवबाग चे डॉक्टर बन्सीलाल पाटील, डॉक्टर विशाल बनसोडे, नर्स पाटील मॅडम, तसेच,अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.. पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश ज्येष्ठ सल्लागार उत्तमभाई ठोंबरे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, कर्जत तालुका उपाध्यक्ष रामदास तुपे, रायगड जिल्हा सदस्य संतोष पवार, शरद श्रीखंडे, सोसायटीचे अध्यक्ष कैलाश शेंडे, अतिशय घाडगे, समीर कुलू, सेक्रेटरी नयन पावले, सोहम शाह, संदीप राऊले, खजिनदार गीता घाडगे, स्मिता पावले, अनुष्री कुळे, ओमकार चूनियाना, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments