Type Here to Get Search Results !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती दिनाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन...

 छत्रपती शिवरायांची जिद्द, पराक्रम, व्यवस्थापन, आणि नेतृत्व, कौशल्य आजही प्रेरणा देतात. स्वराज्याची संकल्पना कृतीत उतरवताना रयतेचे राज्य स्थापन करणे हीच छत्रपती शिवाजी महाराजांची ईच्छा होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती दिनाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर...

    छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच राजकिय गोष्टी सांगितल्या जातात....!

1.अफजलखानाचा कोथळा

2.शाईस्तेखानाची बोटे

3.आग्राहून सुटका

पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!

1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...!6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून  "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे  चिकीत्सक राजे"7. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे ! "जलतज्ञ" राजे छत्रपती शिवराय!!8. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे  १०० हून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, "उत्तम अभियंते राजे"9. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!10. परस्त्री मातेसमान मानत महिलांना  सन्मानाने वागवाणारे "मातृभक्त, नारीरक्षक" छत्रपती शिवराय खऱ्या अर्थाने ते "लोकराजे" होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी *शिवशाही* होती.

     छत्रपती शिवराय यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवरायांची जिद्द, पराक्रम, व्यवस्थापन आणि नेतृत्व, कौशल्य, आजही प्रेरणा देत..

    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्ताने डिकसल पाळी येथील तुलसी छायावसाहात मध्ये अनंदात साजरा करण्यात आला.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद..( आरक्षी )पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

   छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले राज्य हे सर्वसामान्य लोकांचे होते. या राज्यात कोणालाही हींन वागणूक दिली जात नव्हती, शिवराय हे महाप्रतापी तर होते, पण याचबरोबर ते उत्तम प्रशासक ही होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेमध्ये सगळ्याच धर्माचे व जातीचे लोक होते.पण त्यांनी कधीही लोकांमध्ये धर्मावरून मतभेद केले नाहीत. त्यांनी नेहमीच साऱ्याच धर्मांना समान वागणूक दिली. ते प्रत्येक स्त्री ला माते समान म्हणून तिचे रक्षण करत असत.

   छत्रपती शिवाजी महाराज यांचे नेतृत्व, युद्धनीती आणि त्यांच्या राज्यव्यवस्थेचा आदर्श आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने या मोफत आरोग्य शिबिरात , इसिजी, बिपी, सुगर, कॉलेस्ट्रॉल, डोले तपासणी मोफत औ ष धे वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे तालुका सहसचिव श्री.मनेश ठाणगे, तालुका सेल उपाध्यक्ष श्री सुनील गोरे यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी मधवबाग चे डॉक्टर बन्सीलाल पाटील, डॉक्टर विशाल बनसोडे, नर्स पाटील मॅडम, तसेच,अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.. पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली. संघटनेचे संस्थापक. राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शिवाजी सालोखे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर  शितोळे, महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ सल्लागार उत्तमभाई ठोंबरे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, कर्जत तालुका उपाध्यक्ष रामदास तुपे, रायगड जिल्हा सदस्य संतोष पवार, शरद श्रीखंडे, सोसायटीचे अध्यक्ष कैलास शेंडे, अमित घाडगे समीर कुलू नयन पावले सेक्रेटरी सोहम शहा संदीप राऊत गीता घाडगे खजिनदार अनुश्री कुले स्मिता पावले ओमकार चूनियाना.अजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments