Type Here to Get Search Results !

माजी आमदार व भाजप नेते सुरेशभाऊ लाड यांचं पोलिस ठाण्यात झोपून आंदोलन..... अखेर रात्री उशिरा उपोषण स्तगित....


   माजी आमदार व भाजप नेते सुरेश भाऊ लाड यांचे पोलीस स्टेशनला झोपून आंदोलन सुरू.. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा माजी आमदार सुरेश भाऊ लाड.

    कर्जत प्रतिनिधी / संतोष पवार ; कर्जत पोलिस ठाण्याच्या बाहेरच  माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी पायरीवर झोपून आंदोलन सुरू केले आहे.

     सिमाबंदीच्या कामावरती आक्षेप घेत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.

   माजी आमदार लाड यांनी आरोप केला आहे की, कोणतेही सर्वेक्षण न करता शेतकऱ्याना दमदाटी करून सीमा बंदी काम सुरू आहे. शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही लाड यांनी केला. या आंदोलनात लाड यांनी कर्जत पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यांच्या मनमानी कारभारावर  टीका केली. त्यांनी विविध प्रकरणात अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप लाड यांनी केला आहे.त्यामुळे अन्यायाविरोधात ते पोलिस ठाण्याच्या बाहेर आंदोलनास बसले आहेत.

    या आंदोलनास तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपविभागीय अधिकारी डी डी टेले साहेब या ठिकाणी उपस्थित होते.

   पळसदरी येथील कल्पतरू प्रकल्पातील अपंग शेतकऱ्या वर अन्याय होत असल्याचा आरोप लाड यांनी केला आहे. कल्पतरू कंपनीने ज्या जमिनी ताब्यात घेतल्या त्यांची सीमाबंदी करताना मोजणी करावी तसेच शेतकऱ्यांना वेळ द्यावे आणि अतिक्रमण थांबवावे. अन्यायग्रस्त पांडुरंग शिर्के या शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचे लाड यांनी मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून  व्यक्त केला.

भाजप नेते माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांचे उपोषण स्थगित...

 माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी रात्री उशिरा १ वाजता उपोषण सोडले..

    अखेर रात्री उशिरा कर्जत खालापूर चे प्रांत अधिकारी यांनी या संधर्भात मध्यस्थी करून एक पत्र जारी केले या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की जिल्हाधिकारी, अधीक्षक भू अभिलेख रायगड आणि कंपनी प्रशासनातील संपर्क अधिकारी श्री चोरगे यांच्या सोबत चर्चा झाली आहे. त्या नुसार शेतकऱ्यांनी भू अभिलेख विभागाकडे मोजणीसाठी अर्ज करावा, दोन दिवसात मोजणी शुल्क भरावे . त्यानंतर विशेष बाब संबंधित जमिनीची मोजणी तातडीने करण्यात येईल , मोजणी पूर्ण होई पर्यंत कंपनीला संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवर कंपाऊंड वॉल बांधकाम न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. असे लेखी आश्वासन प्रांत अधिकारी यांनी दिले.

Post a Comment

0 Comments