कर्जत / प्रतिनिधी ; कर्जत तालुक्यातील वाढत्या पर्यटनामुळे कर्जत मध्ये दर शनिवार व रविवार वीकेंडसाठी बाहेरील जिल्ह्यातून तालुक्यातून पर्यटक कर्जत मध्ये खूप मोठ्या संख्येने आपल्या वाहनाने येत असतात.
कर्जत मध्ये पसंती असलेले रिसॉर्ट,पिकनिक पॉईंट, फार्म हाऊसवर तसेच थंड हवेचे ठिकाण माथेरान या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात त्यातच कर्जत हे मध्यवर्ती ठिकाण असून मुंबई पुण्यावरून व इतर जिल्ह्यातून येणारी वाहने कर्जत चार फाटा या ठिकाणाहून पुढे जात असतात. यामुळे या ठिकाणी खूप मोठी वाहनांची वरदल निर्माण होते, या ठिकाणी अनेक अपघात देखील झाले आहेत, यामुळे स्थानिकांना व छोट्या मोठ्या वाहनांना शनिवार रविवार या दिवशी कर्जत येथे व कर्जत बाहेरील जाण्यास खूप त्रास सहन करावा लागत आहे.
अ.पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया च्या वतीने नुकताच पोलीस प्रशासनास व आरटीओ विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे. या संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये विविध ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात तसेच जनजागृती निर्माण करण्यास हमेशा संघटनेचा पुढाकार घेतला जातो.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी यांनी कर्जत पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र गरड व पोलीस उपअधीक्षक टेले साहेब तसेच आरटीओ कार्यालय पनवेल यांची भेट घेऊन कर्जत चार फाटा येथील ट्रॅफिक संदर्भात चर्चा करून त्यावर उपाययोजना म्हणून संघटनेचे तालुका पदाधिकारी यांच्या माध्यमातून दर रविवारी ट्रॅफिक पोलीस, पोलीस अधिकारी यांना ट्रॅफिक कमी करण्यास मदत करतील असे सांगण्यात आले.


Post a Comment
0 Comments