ACB, नवीमुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई,१५,००० रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले, अखेर मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.१ वर्ष नोंद रखडून ठेवली होती.
15 हजाराची लाच घेताना नेरळ मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे
प्रतिनिधी / कर्जत ; नेरळ येथील मंडल अधिकारी संदीप भंडारे या अधिकाऱ्याने तक्रारदार यांच्या जागेची नोंद करून घेण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी 15,000 रूपयाची मागणी मंडळ अधिकारी यांनी तक्रारदार यांच्या कडे केली होती. अखेर मंडल अधिकारी भंडारे लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
नेरळ जवळील जिते गावातील सर्वे नंबर ९१/१७,९१/१८,९१/१,९१/१६, या जागेच्या नोंदणी संदर्भात ही नोंद सातबारा उताऱ्यावर करायची होती . यासाठी सुरुवातीला हे प्रकरण तलाठी यांच्याकडे होते, तलाठी यांनी जागेवर नोंद करून अंतिम मंजुरीसाठी मंडल अधिकारी संदीप भंडारे यांच्याकडे पाठवले होते, दरम्यान मंडल अधिकारी यांनी तक्रारदार त्यांच्याकडे एक नोंदीसाठी पंधरा हजार रुपये मागितले होते अशा तीन नोंदी करायच्या असल्याने ही रक्कम ४५ हजार रुपये होती. तक्रारदार यांनी मंडल अधिकारी यांना तडजोडी साठी विनंती केली परंतु मंडल अधिकारी भंडारे यांनी नोंद करण्यासाठी तक्रारदार यांना चार महिने वेल काढू पणा केला असता . यावेळी तक्रारदार त्यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती. अखेर आज मंडल अधिकारी पहिली नोंद करून घेण्यासाठी १५,००० रू ची रक्कम स्वीकारताना नवी मुंबई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
यावेळी मंडल अधिकारी यांच्या कार मध्ये आणि त्यांच्याजवळ एक लाख रुपये अशी रक्कम देखील सापडून आल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई डीवायएसपी नितीन दलवी, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, एस आय प्रदीप जाधव, पोलीस हवालदार रतन गायकवाड, पोलीस हवालदार नाईक, अहिरे, प्रमिला, विश्वासराव यांनी केली.


Post a Comment
0 Comments