कर्जत / प्रतिनिधी ; दीं.३१/०१/२०२५ रोजी.अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या माध्यमातून पंचायत समिती कर्जत अंतर्गत अभिनव शाळा येथे प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, त्यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले.
आज महाराष्ट्राचे चित्र पाहता कोणती ना कोणती रोगराई पसरत चालली आहे. त्यातच लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याकारणाने मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. या आजारात मधून वाईट घटना देखील होत आहेत.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे यांच्या मार्गदर्शनाखाली . प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले यांनी शालेय मुख्याध्यापक यांना पत्रक देऊन जनजागृती करण्याचे आग्रह केले.
सध्या मार्केटमध्ये लहान मुलांना आवडेल असे स्ट्रॉबेरी फ्लेवर चे पदार्थ बाहेरील अन्य व्यक्ती येत असून ते पदार्थ हानिकारक आहे. मुलांना त्या पदार्थामुळे मोठे दुष्परिणाम होऊ शकतात, त्या पदार्थामुळे तोंडाला स्ट्रॉबेरी सारखा वास येतो, या स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या पदार्थाला" स्टोबेरी क्विक" असे म्हणून ओळखले जाते. ही स्ट्रॉबेरी क्विक मुले कॅन्डी म्हणून आवडीने खातात त्यामुळे मुलांना गंभीर असे आजार ओढावले जातात. अशा काही दुर्घटना घडू नये म्हणून पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली प्रदेश कमिटी अध्यक्ष यांच्यावतीने जनजागृती म्हणून विनंती करण्यात आली आहे. की शालेय बाहेरील अशा कोणत्याही व्यक्तीकडून वस्तू किंवा पदार्थ शालेय मुलांनी खाऊ नये. नम्र विनंती मुख्याध्यापक यांना करण्यात आली. यावेळी नेरूळ शहर अध्यक्ष हरीश बदे, युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, चिंचवली ग्रुप ग्रामपंचायत सदस्य विश्वास लोभी, आदी उपस्थित होते...

Post a Comment
0 Comments