समाज कार्य करता ज्ञानेश्वर साळोखे यांनी आपल्या सामाजिक कार्यात आपला वेगळाच ठसा उमटविला आहे.
प्रतिनिधी /; राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व महाराष्ट्र रत्न पुरस्कारांनी सन्मानित , संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष. श्री ज्ञानेश्वर साळोखे, हे सामाजिक कार्यात अत्यंत आघाडीवर आहेत. यांनी त्यांची सामाजिक कार्यामध्ये राज्य भरात आपली वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांनी हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन व पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया या संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला व त्या सोडवण्याचा प्रयत्नही केला. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात, आदिवासी भागात, शहरात, तालुक्यातील संघटनेच्या माध्यमातून अनेक मोफत आरोग्य शिबिरे लाऊन जनतेची सेवा केली आहे. जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा, अनाथ आश्रम, मतिमंद मुलांची शाळा, महिला अनाथ आश्रम, अशा अनेक शाळांचा समावेश केला जातो. त्यांच्या या समाज कार्यातून त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार व अन्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मागील 2024 मध्ये साळोखे यांना राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
ज्ञानेश्वर सालोखे यांच्या या सामाजिक संघटनेच्या कार्यातून समाजात एक प्रकारची जागृतता निर्माण झाली आहे. तसेच अनेक सामाजिक विषयांवर विचारमंथन घडवून आणले आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्ञानेश्वर सालोखे यांची आगली वेगळी ओळख आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यातून त्यांना समज रत्न, समाजभूषण ,यांसारखे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ज्ञानेश्वर सालोखे यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गरीब आणि वंचित लोकांसाठी मदत, मोफत आरोग्य शिबीरे, महिलांचा सन्मान, शिक्षणासाठी मदत, जनजागृती तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध मोहिमा राबविल्या आहेत. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना जनतेमध्ये विशेष स्थान प्राप्त झाले आहे. ज्ञानेश्वर सालोखे यांना या कार्यामुळे "MASTER OF EXCELLENCE " अवार्ड नी सन्मानित करण्यात आले आहे. साळोखे यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम सतत सुरू आहे. त्यांच्या या कार्याचा आदर्श समाजातील अनेकांना प्रेरणा देत आहे. त्यांना मिळालेल्या या" मास्टर ऑफ एक्सैलेन्स"अवॉर्ड मुले त्यांचं सर्वत्र कौतून आणि सुभेच्याच वर्षाव केले जात आहे.

Post a Comment
0 Comments