प्रतिनिधी./भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील अस्सल ग्रामपंचायत हद्दीतील अस्सल वाडी जिल्हा परिषद शाळेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी भाषण देखील करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच चॉकलेट बिस्कीट यांचे वाटप करण्यात आले. हिंद.. पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली व पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या विद्यमानाने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्हा अंतर्गत ऐरोली सेक्टर 6 येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विशाल बनसोडे यांच्या वतीने करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी सहभाग घेतला. या शिबिरात मोफत डोले तपासणी रक्तातील चाचण्या इसीजी बीपी शुगर कोलेस्ट्रॉल इत्यादींच्या तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टर विशाल बनसोडे आणि त्यांचे सहकारी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चांगला सामाजिक कार्य केला त्याबद्दल तेथील रहिवाशींनी त्यांचे आभार मानले व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments