Type Here to Get Search Results !

चोरट्यांचा तपास अद्याप लागला नसल्याने ठानगे कुटुंब आर्थिक संकटात, कर्जत पोलिसांकडून दरोड्याचा धीम्या गतीने तपास...

.    ठानगे कुटुंब आर्थिक संकटात, दरोड्यातील चोरट्यांचा तपास धीम्या गतीने, चोरीच्या घटनेची उकल व्हावी,कर्जत पोलिसांनी स्वान पथकाचे सहाय्य घेतले आहे.. लवकरच चोर पकडले जातील...
      कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील  ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वावे गावात नोव्हेंबर महिन्यात गावातील एका घरात दरोडा पडला. दरोड्यात घरातील कपाटात ठेवलेले पावणे चार लाख रुपये किमतीचे दागिने चोरांनी लंपास केले मात्र या प्रकरणाचा तपास अद्याप पोलिसांकडून लागला नाही.
    ८ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता मंगेश पांडुरंग ठानगे यांच्या पत्नी झोपेतून उठल्या तेव्हा त्यांना कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले निदर्शनास आले. कापाटमधील लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम बघितली असता तेथे त्यांना काहीच दिसून आले नाही. किचनरूम मधुन स्लायडिंग च्या खिडकीच्या किचन ओट्यावरून चोरांनी प्रवेश केला . चोरी झालेला मुद्देमाल ३५ ग्रॅम वजनाचे गळ्यातील सोन्याची गंठण, व ३६ ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची गंठण,१६ ग्रॅम वजनाची गळ्यातील साखळी तसेच ५ सोन्याच्या अंगठ्या, यांच्या सह चाळीस हजार रुपयांची रोकड असा एकूण ३,७९,५०० रकमेचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला. अद्यापही चोरट्यांचा छडा पोलिसांना लागला नसल्याने ठानगे कुटुंब  आर्थिक संकटात सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments