सावधानी बाळगा, गाफील राहू नये, काही होत नाही असा गैरसमज निर्माण करू नका.
प्रतिनिधी ; चीन मधून आलेल्या व्हायरल बद्दल आम्ही सतर्क राहण्याच्या सूचना आमच्या प्रिय फेसबुक व्हाट्सअप मित्रांना दिल्या आहेत, काही होत नाही ही भूमिका मनातून काढून टाका कारण कोविड 19 मध्ये सेवा करताना आम्ही अनुभव घेतलेला आहे, अनेकांना राशन किट व मास्क आणि किटकनाशक फवारणी, तसेच कीटक नाशक पावडर, त्यामुळे त्या वेळेत कोणी शेजारी सोडा तर नातेवाईक पण कोणी मदतीला येत नव्हता, "पोलिस मित्र" म्हणून माझे सर्व साथीदार जीवावर उदार होऊन जनतेला मदत करीत होते.
नुकताच आलेल्या बातमीनुसार आपल्या शेजारील कर्नाटक मध्ये एकाला लागण झाली असून गुजरात मध्ये दोन वर्षाच्या मुलाला लागण झाली आहे, त्याची माहिती नुकताच सर्व न्युज चॅनलवर व वृत्तवाहिनीने दिली आहे, तेव्हा मित्रांनो मी आपल्याला दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जगा, कारण जीवन अनमोल आहे त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे, घरातून ,मच्छी मार्केट, भाजी मार्केट, नातवांना शाळेच्या बस थांब्यावर जाताना म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी, आपल्या काळजीसाठी मास्कचा वापर करा हाथ स्वच्छ धुवा, करायला काय हरकत आहे.
आम्ही आजपासून सुरुवात केली आहे, पहा जमतय का ? - जमलच पाहिजे, याची आता स्वतः पासूनच सुरवात करा.आपण केली तर बाकीचे सर्व करतील.. काळजी घ्या, सावध रहा,." राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार " प्राप्त ; आपला श्री ज्ञानेश्वर साळोखे, संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष..अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद..पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली. (भारत सरकारन निती आयोग) . मो. ६८००५६१४६८...९०२८२८८१४९....

Post a Comment
0 Comments