Type Here to Get Search Results !

संघटनेच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण भागात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन..


   प्रतिनिधी / कल्याण ; अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद (आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली याच्या विद्यमाने आयोजित ठाणे जिल्हा अंतर्गत कल्याण  ग्रामीण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ विशाल बनसोडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

   संघटनेच्या वतीने जिल्ह्यात, तालुक्यात व शहरा ठिकाणी मोफत आरोग्य तपासणीचे शिबिरे भरवली जातात. शिबिरात अनेक गरजू तसेच ज्येष्ठ नागरिक, सामान्य लोक जास्त प्रमाणात येत असतात. शिबिरात सामान्य चाचण्या, रक्तातील चाचण्या, डोळे तपासणी, ई सी जी, कॉलेस्ट्रॉल, बिपी, सुगर वजन तसेच, डॉक्टरांचे मार्गदर्शन केले जाते.

      सामान्य माणूस म्हणून या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक पोलिस मित्र संघटनेच कौतुक करत आहेत त्याच प्रमाणे ज्याच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचा कार्य चालू आहे अश्या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सलोखे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे यांचं देखील कौतुक केलं जातं आहे लोकांचे आशीर्वाद मिळतआहेत.     लहान थोरांचे आशीर्वाद आणि त्यांची सेवा हेच आपले कर्तव्य आहे. आपण अपल कर्तव्य पार पाडत आहोत. त्यामुळे अनेक ठिकाणी संघटनेच्या कार्यकर्त्यांन च्या मार्फत शिबिराचे आयोजन करण्यात ये असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

0 Comments