राज्यातील सर्वच केंद्रीय मंडळाच्या इग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक आहे. शाळांना यातून कोणत्याही प्रकारची पळवाट काढता येणार नाही. याच बरोबर मराठी भाषेच्या अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना परिपूर्ण मराठी भाषेचं ज्ञान असायला हवे, शालात आत मराठी विषय शिकविण्याबाबत शाळांकडून चाल ढकल सहन केली जाणार नाही असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर आता शालेय शिक्षण विभागाची नजर राहणार आहे. या बाबत टाळाटाळ करणाऱ्या शाळांची तक्रार पालकांना आता करता येणार आहे. असेही शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट केलं.
शकेल शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांसाठी असे वेगवेगळे उपक्रम असलेला आणि बदलांस संधर्भातील रोडमॅप तयार केला जात असल्याने शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात शिक्षण संस्थाचालक यांच्या बैठका घेऊन त्यांच्या समस्या आणि काही बदल करता येतील का या संधर्भात चर्चा करण्यात आली.
शालेय शिक्षण विभागाशी संबंधित असलेल्या अडचणी बद्दल उपाययोजना , नवे निर्णय अधीबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे तेही म्हणाले , या विभागाचे नेमके काय व्हिजन असेल ते हे रोडमॅपमधून सांगितले जाणार आहे. हा रोडमॅप लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी पत्रकारांना दिली.
इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविने बंधनकारक असल्याचा सक्तीचा कायदा असतानाही शाळा यातून पळवाट काढताना दिसत आहेत. राज्यातील खाजगी सिबिएससी , आयसीएससी, किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू आहे. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविली जात नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. त्या अनुषंगाने मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे असेही ते म्हणाले.
अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेचे बदलापूर शहर शुभम भोसले यांचा बदलापूर पोलिस उपायुक्त यांच्या वतीने उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल सन्मान करण्यात आला..
अभिनंदन शुभम भोसले...


Post a Comment
0 Comments