Type Here to Get Search Results !

कर्जत तालुक्यातील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे एसीबी.च्या जाळ्यात,1 लाख रुपयांची लाच घेताना....


 कर्जत / प्रतींनिधी ; (प्रफुल जाधव) ;  मंडळ अधिकारी कडाव चंद्रकांत केंडे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 
   तक्रार दाराकडून जमिनीच्या फेरफार नोंद मंजुरीसाठी लाचेची मागणी केली होती, तक्रारदाराने मौजे दहीगाव येथील जमिनीची खरेदी केली होती. त्या साठी फेरफार मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांनी 1लाख रुपयांची मागणी केली होती, तक्रारदार यांनी या संधर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता.
    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चंद्रकांत केंडे यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सदर कारवाई रायगड जिल्ह्याचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक   फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, पोलिस हवालदार महेश पाटील, व त्यांच्या पथकाने कारवाई केली, या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रषटाचारावर गंभीर प्रश्नचिन्हे निर्माण झाले आहे.
नागरिकांनी लाच मागणी झाल्यास प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 या  नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments