Type Here to Get Search Results !

सुभाष ठानगे यांची संघटनेच्या जिल्हा कमिटी अध्यक्ष पदी नियुक्ती..

  संघटनेच्या रायगड जिल्हा कमिटी अध्यक्ष पदी सुभाष मालू ठाणगे यांची नियुक्ती 
 कर्जत प्रतिनिधी ;  अ पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमानाने नुकताच प्रदेश कमिटी यांची मीटिंग पार पडली. नवीन वर्षाचे ध्येय व उपक्रम यांचे नियोजन यासंदर्भात प्रदेश कार्यालय या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

   संघटनेचे कार्य व उद्दिष्टे लक्षात घेऊन जिल्ह्यात अनेक पद नियुत्या करण्यात आल्या.. ज्यांनी संघटनेसाठी संघटनेच्या वाढीसाठी अनेक वर्षापासून प्रयत्न केले अशांच्या नियुक्त्या जिल्हा बॉडीवर करण्यात आल्या.

      संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक श्री ज्ञानेश्वर साळोखे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा पातळीवरील मिटींगचे आयोजन करण्यात आली.

   त्यातलेच एक व्यक्तिमत्व म्हणजेच रायगड जिल्हा सदस्य सुभाष ठाणगे,अनेक वर्ष संघटनेत काम करत असताना संघटना वाढीसाठी अनेक उपक्रमाचे आयोजन, कोरोना सारख्या महामारीत अनेक गरजू नागरिकांना मदत, आणि शालेय शैक्षणिक साहित्य वाटप यांसारखे अनेक उपक्रम यांनी हाती घेतले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संघटनेच्या वरिष्ठांनी सुभाष मालू ठाणगे यांची रायगड जिल्हा कमिटी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांकडून, मित्र मंडळी कडून शुभेच्छांच वर्षाव केला जात आहे.

  (सुभाष ठाणगे )  / संघटनेसाठी असेच मी माझे प्रयत्न चालू ठेवून संघटना वाढीचे काम करेल तसेच संघटनेला कुठेही गालबोट लागता कामा नये, याची मी काळजी घेईल, तसेच वरिष्ठांनी दिलेले मार्गदर्शन चे पालन करेल.. आपण मला दिलेल्या रायगड जिल्हा कमिटी अध्यक्ष पदाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.

 अश्या शब्दात ठाणगे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश सल्लागार श्री उत्तम ठोंबरे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख रुस्तम तरपूर्वाला, रायगड जिल्हा अध्यक्ष विलास शिर्के, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, तालुका युवक अध्यक्ष सुरज चव्हाण. व अन्य पदाधिकारी तालुक्यातील उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments