.. नवीन वर्ष, नवीन संकल्पना, नवीन ऊर्जा घेऊन नवीन सुर्वात. अ. पोलिस मित्र सुरक्षा हर्षद ऑफ इंडिया . व हिंदू पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 1 जानेवारी 2025 रोजी. संघटनेच्या विद्यमाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन संकल्प नवीन ऊर्जा घेऊन नवीन जोश . रायगड जिल्हा परिषद शाळा वावे येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
संघटनेचे ध्येय लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात त्यातच 2024 हे वर्ष संपले असता नवीन वर्ष 2025 सुरू झाले आणि नवीन वर्षाची नवीन सकाळ नवीन दिवस हा पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन 2025 वर्षाची सुरुवात .संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सालोखे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जानेवारी 2025 रोजी उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील वावे गाव येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या ,पेन, पेन्सिल ,रबर, स्केल, चॉकलेट ,बिस्कीट,आणि वडापाव, तसेच आपली स्वच्छता चांगली ठेवण्यासाठी ब्रश व कोलगेट यांचं वाटप करण्यात आले.
यावेळी संघटनेची ज्येष्ठ प्रदेश सल्लागार उत्तम भाई ठोंबरे यांच्या पुढाकाराने व ज्येष्ठ जिल्हा सदस्य सुभाष ठानगे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव कर्जत तालुका युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ विशाल बनसोडे, महिला युवक अध्यक्षा प्राची जाधव, स्कूल शाळेचे मुख्याध्यापक सौ.राऊत मॅडम, पंचायत समिती च्या केंद्र प्रमुख सौ., ग्रामपंचायत सदस्या, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments