Type Here to Get Search Results !

अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे..


 अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.(आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेच्या माध्यमातून, ठाणे,अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, मुलुंड, ऐरोली, वाशी, कोपर खैरने, शासकीय कार्यालये, सोसायट्या, तसेच सामान्य ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

   प्रतिनिधी ; समाजात अनेक वर्षांपासून या संघटनेच्या माध्यमातून , सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले जात आहे. पावसाळा असो, उन्हाळा, हिवाळा, तरी सतत संघटनेच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहेत.

     अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली (निती आयोग) संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली . ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री डॉ. विशाल बनसोडे यांच्या पुढाकाराने आयोजित केली जातात. यांमध्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात.

  " एकमेकांस सहाय्य करू, मानवसेवा परम कर्तव्य " हे संघटनेचे ब्रीद वाक्य डोळ्या समोर ठेऊन संघटनेचे राष्ट्रीय पातळीवरील व प्रदेश पातळीवरील पदाधिकारी अथक परिश्रम करत आहेत. या राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यात, तालुक्यात समाज कार्य केले जाते. त्यात कोणताही भेदभाव न करता आपल्यावर दिलेल्या जबाबदारी नुसार कार्य केले जाते. त्यातच ठाणे जिल्हा अंतर्गत , जिल्हा उपाध्यक्ष श्री डॉ विशाल बनसोडे यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरांमध्ये डोळे तपासणी, बीपी, सुगर, कॉलेस्ट्रॉल, ई सी जी, रक्तातील चाचण्या, सामान्य चाचण्या, यांसारख्या अनेक तपासण्या केल्या जातात. अनेकांना याचा खूप मोठा फायदा झाला आहे तर काहींनी डोळ्यांचे ऑपरेशन सुद्धा फ्री मध्ये झाले आहेत.

    संघटनेच्या माध्यमातून केलेल्या या समाज कार्याची पसंती नागरिकांमध्ये होऊन खूप चांगला प्रतिसाद व सर्व सामान्य जनतेला याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. संघटनेच्या कार्याची समाजात चर्चा आणि संघटनेच्या मान्यवरांच व संघटनेच कौतुक केले जात आहे...


Post a Comment

0 Comments