कर्जत/प्रतिनिधी (सूरज चव्हाण); कर्जत तालुक्यातील नागुर्ले गावाच्या हद्दीत दामखिंडी दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत निर्जन स्थळी गोवंश जनावरांची हत्या करून मांस नेण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानुसार दोन ते तीन गाई अथवा बैल चोरी करून या ठिकाणी आणले गेले आणि त्यांची निरीक्षण हत्या करून त्यांचे मांस पसार करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड आणि त्यांचे पथक तत्काल घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत. जनावरांची चोरी कुठून झाली व मांस नेण्याचा उद्देश काय होता , याचा शोध घेतला जात आहे , याच परिसरात काही महिन्यांपूर्वी ही अशाच प्रकारे गोवंश जनावरांची हत्या करून मांस नेण्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही कालापासून पोलीस प्रशासन गाड्यांची तपासणी अधिक कठोरपणे करीत आहेत. तुझी तस्करांनी निर्जन् स्थळाचा वापर करून आपली कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेबाबत नागरिकांनी सावध करण्याचे आवाहन पोलिसांनी केले अजून, कोणतीही संशयस्पद हालचाल दिसल्यास कर्जत पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments