डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैशाली सायबर कॅफे डिकसळ येथे मोफत ई श्रम कार्ड व आयुष्मान कार्ड व अन्य शासकीय दाखले वाटप.
प्रतिनिधी - विश्वरत्न, भारतरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैशाली सायबर कॅफे डिकसळ येथे डिकसळ परिसरातील सर्व लोकांसाठी मोफत आयुष्मान कार्ड, ई - श्रम कार्ड व शालेय विद्यार्थ्यांचे अपार आयडी कार्ड बनवून देण्यात आले.
अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली व हिंद.. पोलिस फ्रेंड असोसिएशन या संघटनेच्या व वैशाली सायबर कॅफे च्या माध्यमातून हे शिबिर राबविण्यात आले, या वेळी पोलिस मित्र संघटनेचे युवा अध्यक्ष प्रफुल जाधव ( वैशाली सायबर कॅफे चे मालक ) यांनी शिबिरादर्म्यान लोकांना आयुष्मान कार्ड, ई -श्रम कार्ड यांचे फायदे लोकांना पटवून सांगितले तसेच लोकांनी या शिबिरास उत्तम असा प्रतिसाद दिला. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्वरित ई - श्रम कार्ड वाटप सुध्धा करण्यात आले यावेळी डिकसळ परिसरातील ४०-५० लोकांनी सहभाग घेतला.
अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर साळोखे साहेब, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, तालुका उपाध्यक्ष संतोष पवार, संपर्क प्रमुख संतोष थोरवे, दयानंद म्हसे, आदी ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच त्यांच्या हस्ते आयुष्मान कार्ड, ई श्रम कार्ड व शालेय विद्यार्थ्यांचे अपार आयडी कार्ड वाटप करण्यात आले
.


Post a Comment
0 Comments