Type Here to Get Search Results !

संघटनेच्या वतीने कल्याण तहसील कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन....


तहसील कार्यालय कल्याण कार्यालयात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन.
प्रतिनिधी ; दिं.११ डिसेंबर २०२४ , बुधवार  कल्याण तहसीलदार कार्यालयात आज मोफत वैद्यकीय तपासणी व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

     संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक श्री ज्ञानेश्वर साळोखे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री डॉ विशाल बनसोडे यांच्या वतीने या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले.


   या शिबिरात बिपी, सुगर, कॉलेस्ट्रॉल, सामान्य चाचण्या, रक्तातील चाचण्या, डोळे तपासणी, ई चाचण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिरामध्ये शासकीय कर्मचारी, तसेच अनेक नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत अनेकांनी आपले आरोग्य तपासून आपली खात्री करून घेतली. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी. तसेच कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील यात सहभाग घेतला. डॉ. विशाल बनसोडे आणि डॉ पाटील तसेच नर्स.आणि हॉस्पिटल चे कर्मचारी आणि तहसील कार्यालय कल्याण मधील अधिकारी उपातिथ होते.

Post a Comment

0 Comments