कर्जत प्रतिनिधी ; नसरापूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी नेहा ज्ञानेश्वर सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नसरापूर ग्रामपंचायत मध्ये एक वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. त्यावेळी सरपंच पदी जयवंती जनार्दन कोलंबे यांची थेट सरपंच पदी तर श्वेता हडप यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली होती.
या तच एक वर्ष भरात अता साळवड गावच्या सदस्या नेहा ज्ञानेश्वर सावंत यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचाचा कार्यकाल संपल्यानंतर श्वेता हडप यांनी त्या पदाचा राजीनामा सादर केला आणि लगेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या एकमताने बिनविरोध निवड करून नेहा ज्ञानेश्वर सावंत उपसरपंच पदी निवड करण्यात आली. या बाबत ग्रामपंचायत नसरापूर व ग्रामस्थ मांडली कडून नेहा ज्ञानेश्वर सावंत यांचं अभिनंदन व कौतुक केलं जातं आहे.
यावेळी ग्रामसेवक नितीन वैद्य, सरपंच जयवंती कोलंबे, राम कोलंबे, शिवसेना उद्धव ठाकरे गडाचे तालुकाप्रमुख उत्तम कोलंबे, भीमसेन बडेकर एडवोकेट संपद हडप, सदस्य वैभव कडव , मनोहर आप्पा पाटील, सदस्य अंकुश बागडे, प्रवीण पाटील, माधव कोलंबे, पांडुरंग बागडे, ज्ञानेश्वर सावंत, संतोष निकम, अनेक सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments