पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेचे प्रदेश सल्लागार ठोंबरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा व भानसोली आदिवासी अंगणवाडी येथे आनंदात साजरा करण्यात आला.
कर्जत प्रतिनिधी ; कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील भानसोली जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संघटनेचे ज्येष्ठ प्रदेश सल्लागार श्री उत्तम दादा ठोंबरे यांचा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला.
सर्वत्र ठिकाणी आज दत्त जयंती आनंदात साजरी होत आहे. संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस नवीन नवीन ठिकाणी उपक्रम राबविले जातात त्यातच आज 14 डिसेंबर रोजी ठीक सकाळी ११:३०मी. रायगड जिल्हा परिषद शाळा भानसोली व भानसोली आदिवासी अंगणवाडी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना शैक्षणिक साहित्य व जेवण देण्यात आले त्याचप्रमाणे मुलांना बिस्किट चॉकलेट देण्यात आले. उत्तम ठोंबरे यांना अनेक ठिकाणाहून आपल्या मित्र परिवाराकडून व संघटनेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
. संघटनेबद्दल त्यांचं कार्य खूप उल्लेखनीय आहे .गेली अनेक वर्ष ते संघटनेच्या माध्यमातून समाजात समाजकार्य करत आहेत त्यामुळे यावर्षी भानसोली येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व भानसोली वाडी येथील अंगणवाडी मधील विद्यार्थीच्यासोबत आपला वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थी आणि अंगणवाडी शिक्षिका यांनी तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे यांनी मायेची शान व गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केले तर पदाधिकारी यांनी ठोंबरे दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
श्री उत्तम ठोंबरे यांनी सर्वांचे आभार मानले आणि यापुढे देखील असंच समाजकार्य समाजात केलं जाईल असे आश्वासन दिले. यावेळी अंगणवाडी सेविका मीना शशिकांत म्हसे, मदतनीस वैजयंती म्हसे , अ. पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, जिल्हा सदस्य संतोष पवार, ज्येष्ठ नागरिक दाभने बाबा, बदलापूर शहर सदस्य शुभम भोसले, संपर्कप्रमुख संतोष थोरवे, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, श्री संतोष सकपाल, उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments