Type Here to Get Search Results !

पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिरे..



  पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत शासकीय निमित शासकीय पंचायत समिती. तहसील कार्यालय. तसेच पोलीस स्टेशन यामध्ये मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात येत आहे.
    संघटनेच्या माध्यमातून समाजातील दुर्गम भागात, आदिवासी भागात तसेच गाव खेड्यामध्ये आणि जिल्हा परिषद शाळा तसेच लहान मुलांसाठी शिबिरे मोफत केली जात आहेत.
नुकताच ठाणे जिल्हा अंतर्गत कल्याण विभागातील शासकीय कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच तहसील कार्यालय, डोंबिवली मधील शासकीय कार्यालय विद्यालय व सोसायटीमध्ये मोफत शिबिरे राबवली जात आहेत. महाराष्ट्र कौशल्य व रोजगार केंद्र ठाणे या ठिकाणी शासनाच्या अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
      अ.पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, व हिंद.. (आरक्षी) पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर सालोखे, व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर शितोळे ज्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विशाल बनसोडे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने संघटनेच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिरे राबविण्यात येत आहेत. यामध्ये ठाणे जिल्हा अंतर्गत सर्व तालुके शहरे यांचा समावेश आहे.
  या संघटनेच्या माध्यमातून अगल्या वेगळ्या समाजकार्याची लोकांमध्ये चांगलीच प्रशंसा वाढताना दिसत आहे. आणि यांच्या कार्याची नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया या संघटनेचे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments