Type Here to Get Search Results !

अनिल भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला, एकास अटक


 कर्जत / प्रतिनिधी (संतोष पवार); मध्यरेल्वे वरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाच्या पुढील बाजूस रेल्वे फटकात काही गाड्या अडकून पडल्या होत्या त्या वेळी गाडी काढण्याच्या वादातून संवाद साधत तेथील अनिल अनंता भोसले यांना अन्य गडीमधील चार जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या अनिल भोसले यांची नेरळ पोलिसानी रुग्णालयात जाऊन तक्रार दाखल करून घेतली असून एका तरुणाला अटक केली आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार अनिल भोसले हे किरवली वरून  सालवड येथे जाण्यासाठी मध्य रेल्वे चे फाटक चींचवली फटकातून जात होते संध्याकाळी ७:३० वाजता फटकात झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अनिल भोसले व अन्य कार चालकांच्या गाडी मागे पुढे करण्यावरून किरकोळ बाचाबाची निर्माण झाली. त्यावेळी एका पाढऱ्या रंगाच्या कारमधील मालकाने त्याची कार आडवी घालून डाव्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या करला पुढे जाता येत नसल्यामुळे  त्या कार मधील दोन तरुणांनी प्रथम अनिल भोसले यांना शिवीगाळ करण्यास सूर्वात केली. शिवीगाळ करून त्यांना गाडी पाठीमागे घेण्यास सांगितले. तर अनिल भोसले आपली कार मागे घेतो पण शिविगाली करू नये असे बोलले. या गोष्टीचा राग मनात धरून त्यांनी पुन्हा शिवीगाळ करायला सुरावात केली तर गाडीतील ईतर दोन व्यक्तींनी अगोदरच गाडीतून उतरून अनिल भोसले यांच्या गाडीच्या दरवाजा व काचा यांवर हाताने जोर जोरात मारायला सुरुवात केली.

     भोसले यांनी जाब विचारला असता त्यांना हाताच्या ठोसे दिले व चॉपर च्या चपट्या बाजूने अनिल भोसले यांना मारहाण करून त्यांच्या नाकावर, चेहऱ्यावर, डोळ्याजवल गंभीर  दुखापत केली. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना पनवेल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    अनिल भोसले हे उपचार घेत असताना नेरळ पोलिस यांनी जाबजबाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे, रात्री ११ वाजता मारहाण करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे.

Post a Comment

0 Comments