Type Here to Get Search Results !

नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील घटना , आरोपीस ठोकल्या बेढ्या....



नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना आरोपीस ठोकल्या बेड्या आरोपीकडून पिस्तूल केले जप्त.

नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील नारळाची वाडी सलोख येथे घडलेली धक्कादायक घटना.
बीएसएनएल कंपनीचा टॉवर बसवण्याच्या कामावरून ठेकेदार  शोयब शाबिर  बुबेरे राहणार सलोख तर्फे वरेडी कर्जत. यांनी सब ठेकेदार संजू जगदीश मोहिते. जिल्हा अकोला राहणारा रामपूर आलिधरू. यांना पिस्तुल व लोखंडी कटावणीचा धाक दाखवून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नेरळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
 शोयब बुबेरे यांना एका टॉवर उभारन्यासाठी १८००००. रूपये मिळणार परंतु संजू मोहिते हे कमी दरात कामगारांकडून टॉवर बसवण्याचे काम करीत होते. या गोष्टीचा राग मनात धरून १८ डिसेंबर रोजी मोहिते यांना ३०,००० रू दे नाहीतर काम बंद कर असे धमकावले गेले.
 १८ डिसेंबर रोजी शोयब रात्री आपल्या दोन साथीदारांनासह घटनास्थळी आला. हातात पिस्तूल व कटावणी घेऊन धमकावत संजू मोहिते यावर हल्ला केला व कामाच्या साहित्याची तोड फोड केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईल फोन वरून रेकॉर्ड केला . मात्र शोयेब ने त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व सर्व व्हिडिओ डिलीट केला मात्र सुदैवाने  व्हिडिओ तील एक क्लिप व्हॉटसअप वर त्याने लगेचच पाठवल्याने ती डिलीट करायची राहून गेल्याने  ती व्हिडिओ पुरावा म्हणून  पोलिस स्टेशन येथे उपलब्ध करण्यात आली.
  घटनेचे गांभीर्य ओळखून नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी तक्रार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी भारतीय दंड संहिता नुसार कलम ३०८(५),१२७(२),११५(२),३५२,३५१(३), भारतीय हत्या कायदा  १५९,३,२५, अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments