कर्जत प्रतिनिधी (संतोष पवार) ; आधी दोघींसोबत लग्न, तर तिसरीच्या सोबत लग्न गाठ बांधण्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आणि चौथी सोबत संसार थाटण्याची बोलणे सुरू असतानाच महिलांची फसवणूक करणाऱ्याला नेरळ पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत.
मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील राहणारा योगेश यशवंत हुमने वय ३३ वर्ष असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून. अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल महिलेचाही समावेश आहे. दरम्यान आरोपी विरोधात नेरळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल होताच नेरळ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक प्राची पांगे या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या मुस्क्या आवडल्या.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे . नेरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील बोपले येथील राहणारे 34 वर्षीय पीडित विवाहित महिलेने आपल्याच पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत महिलेने पतिविरोधात मानसिक छलवनुक व आर्थिक फसवणूक तसेच पतीचे या आधी लग्न झालेले असताना माझी फसवणूक करून माझ्यासोबत दुसरे लग्न केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
पंधरा ते वीस लाखाची आर्थिक फसवणूक केल्याचे पीडित माझ्याकडून सांगण्यात आले होते. आरोपी याबाबत योगेश हुमणे या विरोधात नेरल पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर २३६/२०२४ प्रमाणे विविध कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा अधिक तपास नेरूळ पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे करीत होत्या.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपी योगेश हुमणे याला मोठ्या शितफीने अटक केली आहे. यासाठी पोलिसांनी एक सापला रचला होता. योगेशने कार खरेदी केली होती. ती कार पत्नीच्या नावे होती. त्यामुळे आपल्या नावावर कार करायची असल्याचे पत्नीला भेटायला आलेल्या योगेशच्या नेरळ पोलिसांनी मोजक्या आवलल्या.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून त्या महिलेला किंवा मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केले असल्याचे उघड झाले आहे. विवाहित असलेला आरोपी योगेश याने आजवर अविवाहित असल्याचे भासवून पीडितांना लुटले आहे. दोन मुलींची लग्न करून तिसऱ्या मुलीच्या सोबत लग्न करण्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम देखील त्यांनी पार पाडला आहे. त्यातच चौथ्या मुली सोबत संसार थाटण्याचा मुलीच्या घरच्यांशी बोलणं देखील सुरू असल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये एक महिला पोलीस कॉन्स्टेबल चा देखील समावेश आहे.
ज्यांचे लग्न जुळत नाही युवा ज्यांचे वय अधिक झाले आहे अशा महिलांसोबत ओळख निर्माण करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम हा आरोपी करत होता. आरोपी योगेश याने लग्न केलेल्या एका महिलेने एका मुलीला जन्म दिलेला आहे असल्याचे सांगण्यात आले आहे. नेरळ पोलीस विभागाकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून सूज्ञ नागरिकांनी सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकी बाबत सतर्क राहावे असे आवाहन नेरळ पोलिसांनी नागरिकांना करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments