Type Here to Get Search Results !

अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेचे बदलापूर युवक अध्यक्ष यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचं वाटप...

 


    अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली बदलापूर शहर युवक अध्यक्ष. मयुर जाधव यांचा अनोखा उपक्रम, मनाला हेलावून टाकणारा उपक्रम .

      प्रतिनिधी बदलापूर  : आज आनंद दिघे अनाथ आश्रम बदलापूर, कात्रपगाव येथील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेचे बदलापूर शहर युवा अध्यक्ष कु. मयूर जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह कात्रपगाव बदलापूर येथील आश्रमाला भेट दिली. आश्रम मधील मुलांसोबत वेळ घालवून मुलांना पुस्तक, पेण, ट्यूबलाईट तसेच बिस्किटे वाटप करण्यात आली व नंतर जेवण सुध्धा देण्यात आले. यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व मुलांनी  संगीत बोलून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सुद्धा केले. 


     मयूर जाधव यांना त्यांच्या आई वाडिलांमुळे लहानपणापासूनच समाजकार्याची ओढ निर्माण झाली होती तसेच त्यांनी इतर ठिकाणी त्यांच्या घरातल्यानसोबत व मित्रांसोबत गरजू लोकांची मदत सुद्धा करत आले आहेत. बदलापूर मध्ये समाज कार्यात त्यांचे नांव आधीपासूनच लौकिक आहे आणि आताच त्यांना अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेमध्ये बदलापूर शहर युवा अध्यक्ष हे पद मिळाले. लगेच त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन अपल समाज कार्य सुरू केले.

      अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेचे संस्थपक.राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर साळोखे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. किशोर शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर मधे हा उपक्रम राबविला. आश्रम मधील सरांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले व त्यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.  यावेळी आश्रम मधील चंदन सर व त्यांचे सहकारी उपस्थित होते  तसेच पोलिस सुरक्षा परिषद या संघटनेचे  बदलापूर शहर युवा अध्यक्ष मयूर  जाधव, तसेच त्यांचे इतर सहकारी नंदिनी कुडलकर, प्रथमेश गावस, सागर राक्षे, ध्रुव पारेख, प्रकाश गावस व ज्योति गावस हे  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments