कर्जत / प्रतिनिधी ;(सूरज चव्हाण): कर्जत तालुक्यातील किरवली गावातील कुमारी गायत्री महेश बडेकर. हिने 17 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या ४१ व्या अखिल भारतीय सब ज्युनियर जूनियर आणि खुल्या पावर लिफ्टिंग स्पर्धेत आपला IND Weilghtlifting आणि पावर लिफ्टिंग क्लब कर्जतची खेळाडू हिने सब जुनियर वयोगटातील ४३kg वजन गटातील DeDlift प्रकारात नवीन राष्ट्रीय विक्रम करून एकूण 290 kg वजन उचलून प्रथम क्रमांक मिळवून आगामी आशियाई व जागतिक पावर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल व तिने खुल्या वयोगटात ४७ kg गटात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन.
गायत्रीचा या कारनाम्यामुळे संपूर्ण भारत देशामधल कर्जत तालुक्याच नाव लौकीक झाले आहे. कु गायत्री बडेकर हिने कर्जत तालुक्यातील किरवली गावाचे आणि परिवाराचे , घरातल्यांची व समाजाचे नाव मोठे केले आहे. तिने केलेल्या कष्टाचे व मेहनतीचे फल तिला नक्कीच मिळाले.
तिच्या या यशाची दखल घेऊन पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेची संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर सालोखे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे, यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव जिल्हा सदस्य श्री सुभाष ठाणगे, यांच्या वतीने कु. गायत्री बडेकर हिला शाल, सन्मान चिन्ह, सन्मान पत्रक देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


Post a Comment
0 Comments