पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरान सज्ज.....31 फर्स्ट च्या आधीच माथेरान मध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल. घाट रस्ता झाला जाम..पर्यटकांना सुरळीत प्रवास होण्यासाठी वाहतूक पोलिस सज्ज.... सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक माथेरान मध्ये दाखल...
नेरळ माथेरान या पर्यटन स्थळी गुलाबी थंडीचा आस्वाद हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शनिवार रविवारच्या विकेंडसाठी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.
मंगलवार 31 डिसेंबर असून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक कृती करू लागले आहेत.
माथेरान या पर्यटन स्थली सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. मात्र थर्टी फर्स्ट ला 2 दिवसांवर असताना माथेरान पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून गेले आहे. सकाळपासून पर्यटकांच्या वाहनांमुळे माथेरान घाट रस्ता वाहतूक कोंडीत सापडला आहे.
नेरळ येथून घाट रस्त्याने पर्यटकांच्या खासगी वाहने व प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी यांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. तर नेरळ रेल्वे स्थानकात रेल्वेने येणारे पर्यटक यांची प्रचंड कधी टॅक्सी स्टँड कडे जाताना दिसत आहे. खासगी टॅक्सी वाहने यांच्या मुले नेरळ हुतात्मा चौकात माथेरान कडे जाणाऱ्या गाड्या वाहतूक कोणती मुले अडकून पडल्या आहेत.
वाहतूक कोंडी कमी करून पर्यटकांच्या गाड्यांना मार्ग दाखविण्यासाठी नेरल वाहतूक पोलिस व पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्ड तैनात होते. पर्यटक हंगामात माथेरान मध्ये येणारी वाहने लक्षात घेऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडण्यासाठी वाहनतल उभारण्यासाठी शासनाकडे मागणी असलेला एमपी प्लॉट प्लॉट 93 हा शासनाकडून माथेरान पालिकेला हस्तांतरित केला जात नाही त्यामुळे वाहनतल अपुरा पडत असल्याने दस्तुरी येथील वाहनतल विस्तारित करण्याची गरज सतत पुढे येत आहे. तर माथेरान शहरात येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन , शासनाने माथेरान दस्तुरी परिसरातील गव्हर्नर हिल येथे असलेल्या प्रशस्त भूखंडावर वाहन तर उभारण्यात आले ...


Post a Comment
0 Comments