Type Here to Get Search Results !

उक्रुल ग्रामपंचायत बिनविरोध उपसरपंच पदी रुपाली धनंजय थोरवे यांची नियुक्ती.....


 कर्जत / प्रतिनिधी (संतोष पवार); उक्रुल ग्रामपंचायत बिनविरोध उपसरपंच पदी सौ. रुपाली धनंजय थोरवे यांची नियुक्ती..

दिं.२७/१२/२०२४ रोजी सकाळी १० वाजता उपसरपंच प्रक्रियेला सुरुवात झाली. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज ग्रामपंचायत सदस्या सौ. रूपाली थोरवे यांचाच दाखल झाला होता. त्या मुळे त्यांची बिनविरोध निवड उपसरपंच पदी करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्री लोहकरे यांच्या अध्यक्षतखालील करण्यात आली.

 उकरून ग्रामपंचायत मधील उपसरपंच शिवाजी जाधव गोसावी. यांनी राजीनामा दिल्यामुळे  पद रिक्त होते. त्यामुळे सौ.रूपाली धनंजय थोरवे यांनी केलेला एकमेव अर्जा नुसार त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


    यावेळी उपस्थित ग्रामसेवक श्री लोहकरे, ग्रामपंचायत सरपंच सौ नीलिमा योगेश थोरवे, माजी उपसरपंच शिवाजी गोसावी, माजी उपसरपंच विलास खडे, सौ.प्रमिला सावंत, सौ. प्रियांका खडे,सौ. सायली भोईर, तसेच त्यांना शुभेच्या देण्यासाठी भाजप चे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष राजेश भगत, किसन मोर्चा उपाध्यक्ष सुनील गोगटे, सौ. नेहा गोगटे, सरचिटणीस दीपक बेहरे, रमेश मुंडे , किशोर ठाकरे, संजय कराले, भालचंद्र सावंत, व ग्रामस्थ संतोष थोरवे, धनंजय थोरवे व अन्य मंडळी उपस्थित होते..



Post a Comment

0 Comments