कर्जत पोलिसांची दमदार कारवाई.. तालुक्यात होतंय कौतुक. विचित्र मोटारसायकलच्या अपघातात सापडल आमली पदार्थ..
कर्जत/प्रतिनिधी : (सूरज चव्हाण) ; मिळालेल्या माहिती नुसार ,कर्जत कल्याण राज्य मार्गालगत कोषाने येथील सी न जी पंप समोर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या मध्ये दोन मोटारसायकल स्वरांमध्ये आपापसात भांडण झाल्या मुळे तेथे नागरिकांची गर्दी जमली तर कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार समीर भोईर व अन्य पोलिस साथीदार देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
गांजा तस्करी करणाऱ्या व्यक्तीला कर्जत पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. कर्जत कल्याण राज्य मार्गावरील कोषाने येथील सीएनजी पंप टी व्ही एस स्क्युटी वरून जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले असता, या वेळी एक तरुण पळून गेला असल्याने पोलिसांना संशय व्यक्त आल्याने मोटारसायकल क्र. म एच ०४ के ए न ९६५३ तपासली असता पोलिसांना वाहनाच्या डिकीत बंद प्लास्टिक पॅकेट मध्ये आणली पदार्थ (गांजा) असल्याचे सापडले.
२२ वर्षीय तरुण तहुर फारुख शेख हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून एक तरुण घटनास्थळावरून पसार झाला आहे.
एकूण ९२,५०० किमतीचा गांजा ताबे कब्जात बाळगणे स्तिथित पोलिसांना सापडल्याने आरोपी तरुणास अधिक तपासासाठी कर्जत पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
पोलिसांच्या मिळालेल्या माहिती नुसार तूहूर शेख हा नेरळ दामत गावाजवळील सौशल्या सोसायटीत राहावयास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या सोबत असलेल्या अन्य साथीदार पिंटू असे नाव सांगण्यात आले आहे. या बाबत कर्जत पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद ३१०/२०२४. एन डी पी एस अधिकारी अधिनियम,१९८५, एन डी पी एस १०८५ (८. सी).२०( बी २) (ए )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार गायकवाड करत आहेत.

Post a Comment
0 Comments