कर्जत / प्रतिनिधी... कर्जत तालुक्यातील सावरगाव येथील रायगड जिल्हा परिषद शाळा. येथील विद्यार्थ्यांना अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली या संघटनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील विविध भागात, तालुक्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम पार पडले जातात
संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली. प्रदेश सल्लागार श्री उत्तमभाई ठोंबरे यांच्या पुढाकाराने आज कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील सावरगाव येथील रायगड जिल्हा परिषद शाळा सावरगाव येथील शालेय विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्यात विद्यार्थ्यांना वह्या.पेन ,पेन्सिल, शॉपनर, रबर, स्केल, त्याच बरोबर मुलांनी आपली स्वच्छ ता राखावी या साठी मार्गदर्शन केले आणि त्यांना कोलगेट ब्रश, चे वाटप केले.
या वेळी गावातील पोलिस पाटील साळोखे, शाळेचे मुख्यध्यापक , प्रदेश सल्लागार श्री उत्तमभाई ठोंबरे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, तालुका युवक अध्यक्ष कु सूरज चव्हाण, अदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments