आपल्या नोकरदार पत्नीने नवऱ्याला खर्चासाठी ५०० रुपये दिले नाहीत म्हणून पती याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना..
कर्जत / प्रतिनिधी ; नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील बोपेले गावातील एन्कीलव या गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहनारे गायकर कुटुंबातील शशांत गायकर यांची नोकरी गेली असल्याने काही महिने घरीच होते. कामधंदा नसल्याने घरी राहणाऱ्या या तरुणाने दुपारी आपली पत्नी युगंधरा शशांत गायकर यांना मोबाईल वरून मेसेज पाठवून ५०० रुपये पाठवण्याची मागणी केली . दुपारी त्याने आपल्या पत्नीला मेसेज पाठवल्यावर शाशंत गायकर हे आपल्या नोकरी करीत असलेल्या पत्नीला सतत फोन करू लागले.
त्यावेळी सतत फोन येत असलेले न उचलता ते फोन युगंधरा कट करत होत्या. शेवटी सतत येत असलेल्या फोनला कंटाळून युगंधरा गायकर यांनी आपले पती शशांत गायकर यांचा मो. फोन ब्लॉक केला . शेवटी पाचशे रुपये मिळाले नसल्याने आणि पत्नी फोन उचलत नसल्याचे याचा राग आल्यामुळे शशांत गायकर वय ४४ यांने रागाच्या भरात आपल्या राहत्या घरात गलफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या घटनेची माहिती संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कलल्यावर नेरळ पोलीस ठाण्यात याबद्दलची माहिती देण्यात आली, नेरूळ पोलिसांनी त्या गुन्ह्याची नोंद 19 डिसेंबर रोजी अकस्मित मृत्यू अशी केली आहे.
नोकरदार पत्नीने नवऱ्याला खर्चासाठी ५००रू दिले नाहीत म्हणून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Post a Comment
0 Comments