Type Here to Get Search Results !

नेरळ येथील अल्पवयीन मुलीवर २३ वर्षीय तरुणाने केला बलात्कार, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल..


   कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिस ठाणे अंतर्गत अल्पवयीन  मुलीसोबत बलात्कार पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

    कर्जत / प्रतिनिधी ;  नेरळ पोलीस ठाण्यांतर्गत एका अल्पवयीन मुलीवर २३ वर्षीय तरुणाने बलात्कार केला. त्या मुलीच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाने त्या मुलीचे व्हिडिओ व्हायरल केले असून या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

       तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत १७ वर्षीय अल्पवयीन मुली सोबत शारीरिक संबंध ठेवून व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.      रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय दशरथ ऐनकर. वय २३ वर्ष आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फिर्यादी मुलगी अल्पवयीन आहे. हे माहीत असतानाही पीडित मुलगी हीचे सोबत प्रेम संबंध प्रस्थापित करत तुझे आई-वडिलांना  ठार मारून टाकेन अशी धमकी देऊन या तरुणाने तिची इच्छा नसतानाही वेलो वेली जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले . त्यानंतर त्याने पिढीते सोबत शरीर संबंध करतानाचा व्हिडिओ मोबाईल मध्ये बनवून सदरचा व्हिडिओ इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलिस अधिकारी डी डी टेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र गरड व पोलिस अधिकारी अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments