कर्जत शहर बचाव समितीच्या उपोषणाला पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
कर्जत प्रतिनिधी : कर्जत येथे सुरू असलेल्या कर्जत शहर बचाव समितीच्या उपोषणाला चांगला प्रतिसाद मिळाला असून आंदोलन अधिक तीव्र होत आहे. कर्जत नगर परिषदेच्या अकार्य क्षमतेला वाचा फोडण्यासाठी सुरू असलेल्या या उपोषणाला स्थानिक नागरिक व सर्व क्षेत्रातले सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होत आहेत. एडवोकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणाला पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या मार्गदरशनाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी उपोषण स्थली भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आणि आरटीओ अधिकाऱ्यांसह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी आंदोलकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. तर माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी नगरसेवक संतोष पाटील, माजी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , यांनीही मुख्याधिकारी त्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी संघटनेचे प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, व रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव यांनी एडवोकेट कैलास मोरे यांना पाठिंबा पत्रक दिले तालुका युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हा सदस्य संतोष पवार व संतोष सकपाल तसेच उपोषणा स्थली असंख्य राजकीय सामाजिक आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments