Type Here to Get Search Results !

कर्जत तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार,आमदार महेंद्र थोरवे यांनी फिरवली अशी चक्रे...


        कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; कर्जत तालुक्यात मनसेला खिंडार... आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश..
           कर्जत तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना  महिला जिल्हा अध्यक्षा सपना किरण राऊत व महिला जिल्हा सचिव आकांक्षा रांकीत शर्मा व महिला तालुका अध्यक्षा योगिता सृंगापुरे , व उपतालुका अध्यक्षा रंजना ताई वाघ व यांच्या समवेत असंख्य महिलांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री  एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेत  आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
            १७ नोव्हेंबर २०२४ , रात्री १० वाजता शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
          या प्रवेश सोहळ्या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला जिल्हा अध्यक्षा सौ सपना किरण राऊत यांनी आपल्या कार्याची जाणीव करून दिली, या वेळी पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख सुदामदादा पावली, मीनाताई थोरवे, मनीषा थोरवे, लताताई थोरवे, मीराताई थोरवे, शिवसेना ज्येष्ठ नेते महेंद्र निगुडकर, शिवसेना तालुका प्रवक्ते विलास श्रीखंडे, किरण राऊत, समीर चव्हाण, रवींद्र राऊत, व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments