अत्यंत प्रेमळ स्वच्छ मन स्वभावाने खूप चांगले यांच्या जाण्याने भजन कीर्तन हरिपाठ संप्रदायात मोठी पोकली निर्माण झाली. त्यांनी चिंचवळी येथील रामनवमी सप्त्यामध्ये गेली 50 वर्ष सेवा केली आहे. तसेच उमरोली गावामधील हनुमान मंदिरा मध्ये चतुर्थी एकादशी शनिवार भजन सेवा करून भजनी मंडळ हरिपाठ मंडळ यांना नेहमी मार्गदर्शन केले. ते उत्कृष्ट असे डबलबारी भजनाचे कार्यक्रम करायचे, त्यांची तुकाराम गाथा हरिपाठ असे अनेक ग्रंथ ओव्या तोंड पाठ असायच्या. तसेच तुकाराम बीज उत्सवामध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन असायचे. त्यांच्या जाण्याने कर्जत तालुक्यातील वारकरी ,भजनी सांप्रदायात शोककला पसरली आहे.
संप्रदाय वाडविण्यासाठी त्यांची खूप मोठी कामगिरी होती. परंतु ह्या अनमोल अश्या ईश्वर विभूती भजन सम्राट भाऊ बुवा लोंगले यांचा यथोचित सन्मान झाला नाही. परंतु गर्व अभिमान त्यागून निःस्वार्थ पणाने त्यांनी संप्रदायची सेवा केली. अशी महान व्यक्ती संप्रदयात पुन्हा होणे नाही. त्यांच्या साठी उमारोली गावचे भजनी कलावंत श्री सचिन बुवा लोंगले पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेचे तालुका उपाध्यक्ष यांनी वैकुंठवासी भाऊ लोंगले यांच्या अनमोल कार्याबद्दल आदर व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली... ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती देओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
भावपूर्ण श्रद्धांजली... पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली

Post a Comment
0 Comments