कर्जत प्रतिनिधी.... अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांचा वाढदिवस जनाई हॉस्पिटल चे सर्वे सर्वा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे रायगड जिल्हा डॉ .सेल अध्यक्ष मा डॉ. संतोष सदावर्ते यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला.
या वेळी डॉ. सदावर्ते यांनी थोडक्यात संघटनेच्या कार्याबद्दल मनोगत मांडून शुभेच्या दिल्या . समाजात अनेक असे कार्य संघटनेच्या माध्यमातून केले गेले आहे. आणि याच कार्याच्या माध्यमातून आज पर्यंत त्यांना ७ राष्ट्रीय पुरस्कार आणि ३ राज्य पुरस्कार मिळाले आहेत.
जनाई हॉस्पिटल चे सर्वे सर्वा डॉ संतोष सदावर्ते यांचं साळोखे यांनी मनापासून अभार मानले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अभार मानले.... या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राहुल सदावर्ते, अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेचे जिल्हा सदस्य सुभाष ठानगे, जिल्हा सदस्य संतोष पवार. आदी उपस्थित होते...

Post a Comment
0 Comments