कर्जत प्रतिनिधी ; अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली या संघटनेच्या माध्यमातून या वर्षी चा विशेष पद सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे जिल्हा अंतर्गत वांगणी येथील किनारा फौंडेशन यांच्या कार्यालयात पारितोषिक सन्मान पत्र देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आहे.
संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षे समाजात समाज कार्य करत अापल्या कार्याच्या माध्यमातून संघटनेच नाव आणि स्वतःच नाव समाजात वावरत असताना अभिमान वाटतो. त्यातच संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य पोलिसांना मदत, नागरिकांना मदत, ज्येष्ठ नागरिक यांना मदत महिलांचा सन्मान, विद्यार्थी यांचा सत्कार, आरोग्य तपासणी, यांसारखे अनेक समाज कार्य या संघटनेच्या माध्यमातून केले जातात त्यातच संघटनेच्या माध्यमातून यांच्या कार्याची दखल घेऊन कु प्रफुल जाधव जिल्हा युवक अध्यक्ष, डॉ. विशाल बनसोडे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, गोविंद सांबरी कर्जत सेल उपाध्यक्ष, शुभम भोसले बदलापूर सदस्य. यांचा पदअधिकारी सन्मान करण्यात आला.
संघटनेच्या वतीने हा सन्मान विशेष करून समाजात चांगल्या प्रकारे कार्य करत असलेल्या एक सामाजिक कार्यकर्त्यास देऊन सन्मान केला जातो तर या वेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, प्रदेश कमिटी ज्येष्ठ कार्यकर्ते श्री उत्तम भाई ठोंबरे, जिल्हा सदस्य संतोष पवार, संपर्क प्रमुख संतोष थोरवे, हरेश बदे, जुंनिद पटेल, कृष्णा पवार, ओंकार घरत.विलास सांबरी, आदी उपस्थित राहून त्यांना शुभेच्या दिल्या..


Post a Comment
0 Comments