कर्जत प्रतिनिधी ;(संतोष पवार) ; कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावेले गावाच्या हद्दीतील नक्षत्र फार्म हाऊस मध्ये दि.२३ नोव्हेंबर सकाळी १०;४५ वा आलेल्या दोघा व्यक्तींकडे विदेशी दारू असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली .
त्यांच्या कडे विदेशी दारू बाळगणे आणि साठा करून ठेवणे या बाबत पुरावे नव्हते. कर्जत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कर्जत पोलिसांच्या पथकाने धाड टाकून. विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
नक्षत्र फार्महाऊस या अस्थापनेमध्ये असलेल्या ग्राहकांना बेकायदेशीर रित्या कोणताही परवाना नसताना तंबाखूजण्ययुक्त हुक्का फ्लेवर व साधने पुरवन्याच्या उद्देशाने साठा करून ठेवलेल्या स्तिथित मिळून आले दरम्यान कोणत्याही प्रकारची विदेशी दारू बाळगणे अगर साठा करणे कायदेशीर परवानगी नसताना एकूण ४९,७९७ किमतीची विदेशी दारू त्यांच्या कडे सापडली. या बाबत कर्जत सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास कर्जत पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

Post a Comment
0 Comments