Type Here to Get Search Results !

कर्जत तालुक्यातील १३ वर्षीय मुलीची छेडछाड प्रकरणी २४ वर्षीय तरुणावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल...


कर्जत प्रतिनिधी (संतोष पवार)::  मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७;३० च्या सुमारास ती अल्पयीन बालिका क्लास वरून घरी येत असताना तिच्या बिल्डिंगच्या पायऱ्यांवर एक तरुण उभा होता.
       अंधाराचा फायदा घेऊन त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रतिकार करत घराकडे धाव घेतली. या आधी ही हा युवक या मुलीचा दोन दिवस पाठलाग करत होता. यामुळे मुलीच्या आईने तातडीने कर्जत पोलिस स्टेशन गाठून घडलेला प्रसंग त्यांना सांगितला.या बाबत कर्जत पोलिस ठाण्यात पॉस्को अंतर्गत तातडीने या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसात कर्जत पोलिस ठाण्याच्या पथकाने सिसी टिव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे एका २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. आरोपी सिद्धेश संजय बिबवे मु. जांबरुख. वय २४ वर्ष हा सध्या न्यायलियन कोठडीत आहे.
    कर्जत पोलिस ठाणे येथे गुन्हा रजि क्र.२९१/२०२४ बालकांचे लैंगिक शत्रक्षन  पॉस्को कलम ७,८,९,१० भारतीय न्याय संहिता   एक्ट  ७४ (३५४) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गर्शनाखाली माहिती पोलिस उपनिरीक्षक मनीषा लटपटे ह्या अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments