प्रतींनिधी (प्रफुल जाधव) ;आळंदी वरून परत येत असताना वारकऱ्यांच्या रिक्षाचा अपघात , खोपोली येथील नगरपालिका रगणालयात उपचार सुरू.
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्पत्ती एकादशी निमित्ताने आळंदी येथे असंख्य वारकरी हे जात असतात ,त्यातच माऊली चे दर्शन घेण्यासाठी हे ठानगे व हजारे कुटुंब गेले असल्याचे ते घरी परतत असताना बोरघाटातील तीव्र उतारावर खिंडीत रिक्षाचा टर्न न बसल्यामुळे रिक्षाने समोरील डोंगराला जोरदार धडक दिल्याने रिक्षा पलटी झाली आहे.
या अपघातात रिक्षा मधील गजानन महादेव ठानगे, अवधूबाई संभाजी ठानगे, हेमलता सतीश हजारे, रुचिता सतीश हजारे, हे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलिस बोरघाट पोलिस व अपघात ग्रस्त टीम ने तत्काळ घटनास्थळी दाखल होत रिक्षात अडकलेल्या जखमींना तत्काल बाहेर काढून खोपोली येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .

Post a Comment
0 Comments