कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) : पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमानाने बाल दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा भुतिविली येथे बालदिन साजरा करण्यात आला.
संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, यामध्ये वह्या, पेन ,पेन्सिल, रबर ,शॉपनर, तसेच चॉकलेट बिस्कीट देण्यात आले. बाल दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी यांनी संघटनेच्या मान्यवरांचा स्वागत केले.
पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक ठिकाणी या प्रकारे विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबवले जातात . त्यातच बालदिन साजरा करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा भुतिवली येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले यावेळी प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, तालुका महासचिव रुपेश कदम, जिल्हा सदस्य संतोष पवार, संपर्कप्रमुख संतोष थोरवे, सदस्य जगदीश कोलंबे, सदस्य मंगेश पडवळ, सदस्य संतोष सकपाल, आदी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments