कर्जत प्रतिनिधी ; कर्जत विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार निवडणूक लडवणारे सुधाकर घरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी मनसे च्या वतीने सुधाकर घारे यांच्या विनंती पत्रानंतर पाठिंबा देणारे पत्र जारी केले, त्यावेळी राजसाहेब ठाकरे यांची व घारे साहेब यांची भेट मुंबई येथील शिवतीर्थ बंगला येथे झाली त्यावेळी अपक्ष उमेदवार घारे यांना आशीर्वाद दिले.
राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याशी चर्चा करून काही मिनिटातच तत्काळ सुधाकर घारे यांनी पाठिंबा जाहीर केला. मनसे प्रदेश सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी कर्जत विधानसभा मतदार संघात परिवर्तन आघाडीचे उमेदवार श्री सुधाकर घारे यांना पाठिंबा पत्र दिले त्या वेळी रायगड जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर तसेच भरतभाई भगत व कर्जत खलापुरचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
घारे यांना पाठिंबा देताना मनसेच्या वतीने सुधाकर घारे यांच्या वतीने मनसे सोबत सर्व निवडणुका लडवल्या जातील, त्यानंतर महाराष्ट्र सरकार मध्ये मनसे सामील होणार असेल तर त्याच कर्जत मतदार संघाचे आमदार सुधाकर घारे असतील असा विश्वास आशीर्वाद देताना व्यक्त केला. या निर्णयाची माहिती देण्यासाठी कर्जत येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते प्रवीण गांगल, तालुका अध्यक्ष यशवंत भावरे, जिल्हा चिटणीस अक्षय महाले, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कर्नुक, मिलिंद मिसाळ, सुभाष राणे, धनंजय दुर्गे, प्रवीण नाईक, तसेच अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचे सर्व सहकारी एडओकेट राजेंद्र निगुडकर, भरातभाई भगत, एकनाथ धुळे, भगवान चंचे, शिवाजी खारीक, दीपक श्रीखंडे, अदी उपस्थित होते. यावेळी सुधाकर घारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे आभार मानले व एका मिनिटात अपक्ष उमेदवार म्हणून मला पाठिंबा दिला अशी माहिती देताना सुधाकर घारे यांनी मनसे पक्षाच्या सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून कर्जत खलापुरचा सर्वांगीण विकास केला जाईल असे जाहीर आश्वासन दिले.



Post a Comment
0 Comments